प्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष!

आता जगभरातील लोक ही कथा बघू शकणार आहे. बायोपिक चित्रपटांमध्ये काम करणे एक मोठे आव्हान असते हे मला समजले आहे आणि या चित्रपटात माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सायनाचे पात्र साकारणे होते.

    बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट गेल्या महिन्यात सिनेमाघरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

    २३ एप्रिलला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर या चित्रपटच प्रदर्शित होणार आहे. परिणीती चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे खूपच खूष आहे. यावर परिणीती म्हणाली आहे की, ‘चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे मी खूप उत्साही आहे. आता जगभरातील लोक ही कथा बघू शकणार आहे. बायोपिक चित्रपटांमध्ये काम करणे एक मोठे आव्हान असते हे मला समजले आहे आणि या चित्रपटात माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सायनाचे पात्र साकारणे होते.

    सायनाच्या आईची इच्छा असते की, सायना खूप मोठी बॅडमिंटनपटू व्हावी. सायनासुद्धा आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. पुढे जाऊन हे स्वप्न केवळ तिच्या आईचेच नाहीतर सायनाचेही होते. सायनाला आपल्या देशाकडून खेळायचे असते. यासाठी ती खूप कष्ट करते आणि त्यादरम्यान, तिच्या आयुष्यात बर्‍याच अडचणी येतात. यावर हा सर्व चित्रपटा आधारित आहे.