popatlal

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(taarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील पोपटलालच्या बायकोचे स्वागत करण्याची तयारी गोकुळधामवासीय करत आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(taarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मालिकेमध्ये नेहमी वेगळे विषय हाताळत मनोरंजन होत असल्याने आजही ही मालिका लोकांच्या मनावर अधिराज्या गाजवत आहे. गोकुळधाम सोसायटीत राहणारी सगळीच पात्र लोकप्रिय झाली आहेत. या पात्रांपैकी पत्रकार पोपटलाल(popatlal marriage) हे पात्र वेगळ्या प्रकारचे आहे. पोपटलालच्या लग्नाची चर्चा अनेक वेळा मालिकेत झाली आहे. मात्र उशीरा का होईना आता पोपटलालचे मालिकेत लग्न झालेले दिसणार आहे, अशी चर्चा आहे. गोकुळधामवासीय नव्या नवरीच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या पोपटलाच्या घराच्या बाल्कनीत एक नवविवाहित तरुणी दिसून आली. तिला पाहून सोसायटीतील सदस्यांना धक्का बसला आहे. पोपटलालने खरंच लग्न केलं आहे यावर त्यांचा आता विश्वास बसला आहे. नववधूचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गोकुळधाम सोसायटी नवीन प्लॅन करत आहे.

मालिकेतल्या पात्रांइतकाच प्रेक्षकांनाही पोपटलालचं लग्न कधी होणार , हा प्रश्न पडला होता. मात्र आता सगळ्यांचीच चिंता मिटली असे म्हणायला हरकत नाही.