Pave the way for screening of "Mumbai Saga"; The petition was filed by the gangster's family

रवी मल्लेश बोहरा ऊर्फ गॅगस्टर डी. के. राव आणि दिवंगत गॅगस्टर अमर नाईकच्या कुटुबियांनी न्यायालयात याचिका केली आहे. सदर चित्रपटाची माहिती आम्हाला प्रसिद्धी माध्यमातून मिळाली. यामध्ये बोहरा, नाईक आणि अश्विन नाईक यांच्या वैयक्तिक जीवनासंबधित घटना दाखविण्यात आल्या आहेत, त्याचा आमच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार असून आमच्या अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना नोटीसही बजावली होती.

    मुंबई : मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेल्या `मुंबई सागा’ या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे शुक्रवारी (आज) या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    रवी मल्लेश बोहरा ऊर्फ गॅगस्टर डी. के. राव आणि दिवंगत गॅगस्टर अमर नाईकच्या कुटुबियांनी न्यायालयात याचिका केली आहे. सदर चित्रपटाची माहिती आम्हाला प्रसिद्धी माध्यमातून मिळाली. यामध्ये बोहरा, नाईक आणि अश्विन नाईक यांच्या वैयक्तिक जीवनासंबधित घटना दाखविण्यात आल्या आहेत, त्याचा आमच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार असून आमच्या अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना नोटीसही बजावली होती.

    सदर याचिकेवर गुरुवारी न्या. अमजद सय्यद आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. तेव्हा, नाईक आणि बोहरा यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले अद्यापही प्रलंबित आहेत. सदर चित्रपटामुळे या खटल्यांवर परिणाम होईल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने कऱण्यात आला.

    मात्र, चित्रपट प्रदर्शानच्या एक दिवस आधी आम्ही चित्रपट प्रदर्शन रोखू शकत नाही असा दावा निर्मात्यांनी केला. त्यीच दखल घेत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ऐनवेळी याचिका दाखल करण्यात आल्यामुळे आम्ही दिलासा देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकरत्यांना दिलासा दण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.

    ‘मुंबई सागा’ चे लेखक आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी केले आहे. भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मीसह सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे हा सिनेमा शुक्रवार १९ मार्च २०२१ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.