summons has been served to anurag kashyap by versova police station to appear on 1 10 2020 for investigation of offence registered against him

अभिनेत्री पायल घोषने(payal ghosh) काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर(anurag kashyap) गैरवर्तनाचा आरोप केला होता. पोलिसांनी अनुरागची चौकशी केली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेल्या चौकशीवर पायल नाराज आहे. तिने मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून कारवाई करण्याची विनंती केली आहे.

अभिनेत्री पायल घोषने(payal ghosh) काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर(anurag kashyap) गैरवर्तनाचा आरोप केला होता. पायलने वर्सोवा पोलीस|(versova police) ठाण्यात अनुराग विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनुरागची चौकशी केली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेल्या चौकशीवर पायल नाराज आहे. तिने मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून कारवाई करण्याची विनंती केली आहे.

पायल घोषने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,‘बरेच दिवस उलटले आहेत पण मुंबई पोलिसांनी त्यांचे काम केलेले नाही. मी तुम्हाला विनंती करते. हे प्रकरण महिलांशी संबंधीत आहे आणि आपण कशा प्रकारचे उदाहरण लोकांसमोर ठेवत आहोत याचा विचार केला पाहिजे’. तर आणखी एका ट्विटमध्ये ती म्हणते की, ‘आता चार महिने झाले आहेत.अनुराग विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मी मेल्यानंतर यावर कारवाई होणार आहे का?’ त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.