anurag kashyap payal ghosh

अभिनेत्री पायल घोषने(payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर(anurag kashyap) लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. अनुराग विरोधात तिने एफआयआर दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र  पायल पोलिसांच्या या चौकशीवर नाराज आहे. अनुराग खोटं बोलत असल्याचे सांगत तिने पुन्हा एकदा अनुरागवर टीका केली आहे. एक व्हिडिओ तिने ट्विटरवर पोस्ट(new video on twitter) केला आहे.

अनुरागला भेटले त्यादिवशी नक्की काय झालं हे पायलने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पायल म्हणते की,“मी अनुरागला आधी ओळखत नव्हते. आमची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं . मी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ते धुम्रपान करत होते. तसेच दारु पित होते. मला त्या विचित्र वासामुळे उलटीसारखं झालं. तो वास गांजा किंवा ड्रग्जचा होता. नंतर त्यांनी मला दुसऱ्या खोलीत नेलं अन् माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.”

पायलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे दरम्यान १ ऑक्टोबरला सकाळी १०.०५ वाजता अनुराग चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर  होता. जवळपास ८ तास अनुरागची चौकशी करण्यात आली. अनुरागला चौकशीसाठी बोलावल्यानंतर पायल घोषने मुंबई पोलिसांचे आभार मानले. अनुरागच्या वकिल प्रियांका खिमानी यांनी  अनुरागवरील आरोप फेटाळून लावले होते.