मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का? व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीला अश्रू अनावर!

पायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिची खिल्ली उडवलीय. ” कंगनाचं दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.

    बंगाल विधानसभा निवडणुकींनंतर बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतला तर बंगाल निवडणूकींवर परखड मत मांडणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलंय. कंगना नंतर अभिनेत्री पायल रोहतगीने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केलाय.

    अभिनेत्री पायल रोहतगीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तीला अश्रू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय. ती या व्हिडीओत ओक्साबोक्शी रडतेय आणि ती व्यवस्थेवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना दिसतेय. पायलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायलाही सुरुवात केलीय.

    या व्हिडीओत पायल म्हणतेय, “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही. जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्यासोबत तुम्ही असे वागता. लोक तुमचे फोटो लावून डॉक्टर बनत आहेत. लोकांची फसवणूक करत आहेत. मोदीजी हे ठिक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करायचा का? आम्हालाच का टार्गेट केलं जात? ” असे सवाल पायलने उपस्थित केले आहेत.

    पायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिची खिल्ली उडवलीय. ” कंगनाचं दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.” असं म्हणत पायलला ट्रोल केलं. तर एक युजरने ओव्हर अॅक्टिंगचे ५० रुपये कट कर अशा आशयाच मीम शेअर करत पायलला ट्रोल केलंय.