अभिनेत्री पायल रोहतगीला आपण अनेकदा सेलिब्रिटींवर टीका करताना पाहीले आहे. सध्या तिने सलमानवर निशाणा साधला आहे. सलमान खानची बिइंग ह्युमन ही कंपनी एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अॅन्ड रन केसनंतर

अभिनेत्री पायल रोहतगीला आपण अनेकदा सेलिब्रिटींवर टीका करताना पाहीले आहे. सध्या तिने सलमानवर निशाणा साधला आहे.  सलमान खानची बिइंग ह्युमन ही कंपनी एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अॅन्ड रन केसनंतर सलमानची प्रतिमा सुधारण्यासाठी या संस्थेची निर्मिती झाली असल्याचे पायल हीनेे म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर पायलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, अगदी सुरुवातीला माझ्या मनात सलमानबद्दल आदर होता. मात्र मागच्या काही काळात त्याने जी गुंडगिरी सुरु केली आहे ती पाहून माझा त्याच्याविषयीचा आदर आता संपला आहे. 

सलमानची बिइंग ह्युमन ही कंपनी फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अॅन्ड रन केसनंतर त्याची लोकांमध्ये असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी ही कंपनी तयार केली असल्याचा आरोप पायलने केला आहे. या संस्थेद्वारे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचेही म्हटले जाते. 

पायल पुढे म्हणते की, बॉलिवूड काही सलमानच्या मालकीचे नाही. त्याने आपली गुंडगिरी थांबविण्याची गरज आहे. त्याची गुंडगिरी अशीच सुरु राहीली तर त्याच्या कर्माची फळे त्याला याच जन्मात भोगावी लागतील. सोशल मीडियावर सध्या या पायलच्या व्हिडीओची खूप चर्चा आहे. याआधी अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमानवर टीका केली होती.त्यामुळे सलमान त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजते. पायलच्या या व्हिडिओला सलमान कशाप्रकारे उत्तर देतो, हे पाहणे महत्वाचे आहे.