picasso

राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे (Samay Sanjeev Tambe) आणि अश्विनी मुकदाम (Ashwini Mukadam) अभिनीत चित्रपट ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवतो.

    मुंबई : अमेझॉन प्राइम व्हिडिओने(amazon prime vide) आज त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला आहे. या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रीमिअर येत्या १९ मार्चला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

    राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे (Samay Sanjeev Tambe) आणि अश्विनी मुकदाम (AshwiniMukadam) अभिनीत चित्रपट ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवतो.

    शिलादित्‍य बोराद्वारे (Shiladitya Bora) निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग (Abhijeet Mohan Warang), तसेच सह-लेखक तुषार परांजपे (Tushar Paranjape) यांनी केले आहे. भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य १९ मार्च २०२१ पासून फक्‍त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्‍ड प्रीमिअर पाहू शकतात.


    चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, “मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले.

    प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, “मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून तिने अलिकडील दशकामध्‍ये अनेक उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत.

    बोरा पुढे म्हणाले,‘पिकासो’सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल. प्‍लॅटून वन फिल्‍म्‍समधील आमच्‍या संपूर्ण टीमला अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत सहयोग करण्‍याचा आणि आमच्‍या स्‍वत:च्‍या लहानशा प्रयत्‍नामध्‍ये आणि त्यांच्या वैविध्‍यपूर्ण कथानकांमध्ये ‘पिकासो’ सारख्या कथांचे योगदान देण्‍याचा आनंद होत आहे. मी भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील स्ट्रिमिंग सर्विसवर या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमिअर सादर होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”