मुंबईत येताच कंगनाने पुन्हा शिवसेनेला डिवचलं, सिद्धीविनायकं दर्शन घेतं, काढला जूना वाद उकरून!

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगना आणि शिवसेनेत रंगलेला सामना सगळ्यांनीच बघितला. नुकताच कुठे हा वाद शमला आहे. आता कंगना पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने मुंबईत येताच सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात गजरा अशा मराठमोळ्या वेशात आली होती. तसंच, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिनं शिवसेनेवरही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाहीये, असं म्हणत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर इथं सुरक्षित वाटत असल्याचं ट्विट कंगनानं केलं आहे. तसंच, जय हिंद व जय महाराष्ट्र असा नाराही दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका व आरोप केल्यामुळं कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसंच, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. यावर शिवसेनेनंही कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं आपल्या राज्यात निघून जावं, असा इशारा दिला होता. नंतर कंगनाच्या ऑफिसची तोडही पालिका कर्मचाऱ्यांनी केली होती.