pm narendra modi

कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण आता अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरु होऊ शकतात. चित्रपटगृहे उघडल्यानंतर ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार असल्याचे समजते.(PM narendra modi movie will be released again)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे.  हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी या चित्रपटाने  फारशी कमाई केली नव्हती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे यापेक्षा चांगलं काय असू शकतं, असे संदीपने म्हटले आहे. त्यामुळे आता निर्माता संदीप सिंहने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या चित्रपटात विवेक ओबेरॉयसोबतच बरखा बिश्त आहे. बरखा यांनी जशोदाबेनची भूमिका साकारली आहे तर  मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. तसेच बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन हेदेखील या चित्रपटात आहेत.  ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.