ऑनड्यूटी रोमान्स करणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, VIDEO व्हायरल झाला आणि…

ऑनड्युटीवर असताना असे व्हिडीओ शूट करण्यामागणं कारण त्यांना यामध्ये विचारलं गेलं आहे. शिवाय त्यांना काही दिवसांसाठी सस्पेंड देखील करण्यात आलं आहे.

  गेल्या दीड वर्षापासून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांचा मनस्ताप प्रचंड वाढला आहे. नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी दिवस- रात्र पोलीस मेहनत घेत आहेत. सर्वसामान्य माणूस घरात बसला आहे. तर दुसरीकडे पोलिसांना आपल्या सुट्ट्या रद्द करुन जनतेच्या रक्षणासाठी आधिक वेळ काम करावं लागत आहे. अशा त्रस्त वातावरणात चार विरंगुळ्याचे क्षण म्हणून एका पोलीस जोडप्यानं बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

   

  व्हिडिओ करणं पडलं महागात

  हे जोडपं दिल्लीतील आहे. या जोडप्याने लॉकडाउनच्या ड्युटिवर असतानाच पोलिसांच्या गणवेशात बॉलिवूड गाण्यांवर डान्स केलाय. हे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र काहींनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओनंतर DCP उशा रंगानी यांनी त्यांना अधिकृत नोटिस बजावलं आहे. असे ऑनड्युटीवर असताना असे व्हिडीओ शूट करण्यामागणं कारण त्यांना यामध्ये विचारलं गेलं आहे. शिवाय त्यांना काही दिवसांसाठी सस्पेंड देखील करण्यात आलं आहे.

   

  अनेकांनी केली कायदेशीर कारवाईची मागणी

  अनेकांनी पोलिसांच्या या व्हिडीओवर टिकेचा वर्षाव केला. अन् त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. मात्र काही नेटकऱ्यांनी या कारवाईला विरोध देखील केला आहे. त्यांनी पोलिसांच्या सद्य परिस्थिचीचं वर्णन करुन त्यांच्या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.