‘आईचे चित्रपट बघताना लाज वाटते’, अभिनेत्री पूनम ढिल्लोंच्या मुलाने केला खुलासा, नुकतीच घेतलीये बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

“हे पाहून मला थोडं अस्वस्थ वाटायचं, कारण मी त्यांचा मुलगा आहे. त्यांचे चित्रपट पाहताना मी लाजायचो. मी त्यांचे गाणे पाहिले आहेत.

  प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी अनेक यशस्वी चित्रपटात काम केलंय. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासह धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र कपूर, ऋषि कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटात त्या झळकल्या. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, इतक्या यशस्वी अभिनेत्रीचा मुलगा अनमोल ठकेरिया ढिल्लोंने आतापर्यत आईचा एकही चित्रपट बघितला नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)

  अनमोलला जेव्हा विचारलं गेलं की, “तू आतापर्यंत तुझ्या आईच्या कोण-कोणत्या फिल्म्स पाहिल्या आहेत ?” यावर उत्तर देताना अनमोल जे काही म्हणाला “मी प्रामाणिकपणे सांगतो, मी आतापर्यंत माझ्या आईचा कोणताच चित्रपट पाहिला नाही. त्यांच्या चित्रपटापासून मी थोडं दूरच राहणं पसंत करतोय..!”. आईसोबत दुसरं कोणी तरी रोमांस करतंय हे पाहून त्याला विचित्र वाटत असल्याचं कारण अनमोलने सांगितलं.

  “हे पाहून मला थोडं अस्वस्थ वाटायचं, कारण मी त्यांचा मुलगा आहे. त्यांचे चित्रपट पाहताना मी लाजायचो. मी त्यांचे गाणे पाहिले आहेत. नूरी, सोनी, महीवाल चित्रपटाची गाणे किंवा मग ऋषि कपूर यांच्यासोबत गाजलेली गाणी मी पाहिले आहेत. त्यांची गाणी मी एन्जॉय करतो.

  अभिनेत्री पूनम ढिल्लों यांचा मुलगा अनमोल ठकेरिया ढिल्लोंने याच वर्षी संजय लीला भन्साळी निर्मीत Tuesdays & Fridays मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. हा चित्रपट गेल्याच महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता.