poonam pandey

या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तिला पोलिस स्थानकात बोलावण्यात आलं होतं. लॉकडाउनचे नियम मोडल्या प्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय आपदा अधिनियम सेक्शन १८८, आयपीसी सेक्शन २६९ आणि ५१ बी अंतर्गत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री पूनम पांडे आपल्या अक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा अश्लिल फोटोशूट आणि व्हिडीओंमुळे तिच्याविरोधात तक्रारी देखील केल्या जातात. पण यावेळी कोणत्या फोटोशूट किंवा व्हिडिओमुळे नाही. तर नियम तोडल्यामुळे पूनमला मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. तरी देखील पूनम पांडे आपल्या मित्र-मंडळींसोबत चर्चगेट ते मरिन लाईन्स प्रवास करताना दिसली.  कुठल्याही प्रकारचा मास्क किंवा सुरक्षितता न बाळगता कार चालवताना दिसली होती.  दरम्यान तिला पाहण्यासाठी काहीशी गर्दी देखील झाली होती. त्यावेळी पूनमसह गर्दी करणाऱ्या सर्व लोकांविरोधात पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.