लोकप्रिय अभिनेत्री आहे आर्थिक संकटात, गंभीर आजारांशी ही देतेय लढा!

शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत

    ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ यासारख्या अनेक मालिकांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री शगुफ्ता अली या सध्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत एवढंच नाही तर त्या आजारी आहेत.

    शगुफ्ता यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शगुफ्ता यांनी त्यांच्या आर्थिक संकटासोबत त्यांच्या आजरपणा बद्दल सांगितले त्या म्हणाले, “मी गेल्या २० वर्षांपासून आजारी आहे. पण त्यावेळी मी तरूण होते आणि मी ते सांभाळू शकत होते. मला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला होता. मी त्याला लढा दिला आणि मी वाचली. या आधी हे फक्त माझ्या काही जवळच्या मित्रांना सोडून कोणालाच माहित नव्हतं, असे त्या म्हणाल्या.

     “जेव्हा माझ्या हातात बरीच कामं होती तेव्हा मला ब्रेन कॅन्सर होता. यावेळी माझ्या अनेक सर्जरी झाल्या. प्रत्येक केमोरेथेरपीला असे वाटायचे की माझा नवीन जन्म झाला आहे. त्यावेळी मी माझं काम आणि जबाबदाऱ्या सांभाळत होते. शस्त्रक्रियेच्या १७ दिवसानंतर मी माझ्या छातीवर उशी लावून मालिकेच्या चित्रीकरणासाठी दुबईला गेली होती.”

    त्यांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी बोलताना शगुफ्ता म्हणाल्या, शूटच्या वेळी त्यांचे अनेक अपघात झाले. पाय दुखापत झालीत. एकदा त्या वडिलांना भेटायला जात असताना, शगुफ्ता यांचा एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये त्यांच्या हाताच एक हाड मोडलं आणि त्यांच्या हातात एक स्टीलचा रॉड घालावा लागला. अशा कठीण परिस्थितीतही शगुफ्ता काम करत राहिल्या.