‘त्याने मला न्यूड ऑडिशन द्यायला सांगितलं’… अभिनेत्रीने Video शेअर करत राज कुंद्रावर केले धक्कादायक आरोप!

राज कुंद्राने नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितलं होतं, असा आरोप तिने केला आहे. सागरिकाने एका व्हिडीओतून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

    अश्लील चित्रपट निर्मिती करणारं रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केलं. राज कुंद्राला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत, अभिनेत्री सागरिका सोना सुमनने खळबळजनक आरोप केले आहेत. राज कुंद्राने नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितलं होतं, असा आरोप तिने केला आहे. सागरिकाने एका व्हिडीओतून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

    काय म्हणाली सागरिका

    “मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये मोठे लोक सहभागी आहेत. राज कुंद्रा याचं नाव समोर आलं आहे. लॉकडाउनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली गेली. मला धक्काच बसला आणि मी नकार देत कॉल बंद केला”, असा अनुभव अभिनेत्री सागरिका सोना सुमनने केला आहे.

    “त्या व्हिडीओ कॉलमध्ये तीन लोक होते. ज्यात एकाचा चेहरा दिसत नव्हता, पण ती व्यक्ती राज कुंद्रा होती. कारण कुंद्राचा सहाय्यक असलेला कामत सतत या सर्व वेबसाईट राज कुंद्रा चालवतात, असं म्हणत होता. राज कुंद्राने मला न्यूड ऑडिशन द्यायला सांगितलं होतं. राज कुंद्राचं नावही आज समोर आलं आहे. लवकरात लवकर या लोकांना अटक करण्यात यावी, कारण खूप लोकांचं आयुष्य या रॅकेटमुळे खराब होत आहे”, असं सागरिकाने म्हटलं आहे.