२०२१ च्या एप्रिलमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट ३ भागात रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात अश्वत्थामा आधुनिक काळातील सुपरहिरो म्हणून दाखविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे विकीला त्याचे १०० किलोपक्षाही जास्त वजन वाढवायचे आहे. या चित्रपटाशिवाय विकी कौशल शहीद उधम सिंग, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची बायोपिक आणि करण जोहरची ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल लवकरच उरी द सर्जिकल स्ट्राईकनंतर आदित्य धरच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज समोर आलं आहे. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटाला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
View this post on Instagram
पोस्टरमध्ये विकीचा लूक जबरदस्त दिसत आहे. हा चित्रपट पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. विकी कौशलनेही या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बरीच तयारी केली आहे. विकी या चित्रपटासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटात विकी कौशल महाभारतातील महान योद्धा ‘अश्वत्थामा’ ची भूमिका साकारणार आहे.