प्रभास झालाय आता एक ग्लोबल स्टार

दोन भागांचे महाकाव्य असलेला बाहुबली चित्रपट २०१६ मध्ये भारतात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सीमा ओलांडून जपान, चीन, इंडोनेशिया, लंडन आणि नुकत्याच रशियन टेलीव्हिजनवरदेखील प्रदर्शित करण्यात आला.

दोन भागांचे महाकाव्य असलेला बाहुबली चित्रपट २०१६ मध्ये भारतात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सीमा ओलांडून जपान, चीन, इंडोनेशिया, लंडन आणि नुकत्याच रशियन टेलीव्हिजनवरदेखील प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाला जवळपास जगातल्या प्रत्येक भागात दर्शकांचे प्रेम लाभले. यासोबतच, प्रभासचा आणखी एक चित्रपट साहोला जानेवारीत जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ज्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. आपण गाजावाजा न करता शांतपणे कठोर मेहनत करावी आणि चित्रपटांच्या यशातून बोलावे, यावर प्रभास विश्वास ठेवतो. प्रभास आता फक्त भारताला नाही तर जगातल्या अनेकांसाठी सुपरस्टार आहे. त्याची लोकप्रियता आता पॅन इंडिया न राहता पॅन वर्ल्ड झाली आहे.

प्रभास नेहमीच दिग्दर्शकांचा आवडता राहिला आहे कारण त्याने नेहमीच आपल्या चित्रपटांमधून दमदार परफॉर्मन्स दिला आहे आणि त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशासोबत आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी झाला आहे. तो नेहमीच स्वत:साठी एक बेंचमार्क स्थापित करत आला आहे आणि त्याची स्वत:शीच स्पर्धा राहिलेली आहे. अभिनेता एक प्रेमी ते एक बागी आणि इतरही अनेक व्यक्तिरेखा लीलया पेलवणे उत्तमरीतीने जाणतो. निश्चितच, प्रभासच्या समर्पण आणि कठोर मेहनतीने त्याला पैन-वर्ल्ड स्टार बनवले आहे ज्याला सीमांचे बंधन नाही. त्याच्या व्यक्तिरेखांची लोकप्रियता पाहताना, नुकताच प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वार्नरने देखील आपल्या मुलीसोबत प्रसिद्ध बाहुबली डायलॉगवर एक व्हिडिओ रिक्रिएट केला आहे. या व्हिडिओला प्रचंड लाईक करण्यात आले आहे ज्याला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साहाला सीमाच राहिली नाही. या सगळ्यावरून हेच दिसते की कित्येक वर्षांनी देखील हा चित्रपट दर्शकांच्या मनात अजूनही ताजाच आहे. प्रभास सध्या आपल्या विसाव्या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेतो आहे आणि दिग्दर्शक नाग-अश्विनसोबतचा हा त्याचा आगामी चित्रपट पहिल्यांदाच पॅन-वर्ल्ड प्रदर्शित होणार आहे.