गौरीच्या नव्या लूकची प्रशंसा, मेकओव्हर मागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा

गौरीच्या मेकओव्हर मागं जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीनं आपली मतं ठामपणे मांडावीत, शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळं गौरीचा फक्त लूक नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखील परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडत आहे.

    महेश कोठारेंची निर्मिती असलेली स्टार प्रवाहवरील मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून, गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. जयदीपच्या मदतीनं तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे.

    गौरीच्या मेकओव्हर मागं जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीनं आपली मतं ठामपणे मांडावीत, शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळं गौरीचा फक्त लूक नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखील परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडत आहे. गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत.

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे पुढील भाग देखील मनोरंजनानं परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला शालिनी घेणार यात शंका नाही. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.