prarthana

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे(prarthana behre) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. तिने सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रार्थना बेहरेने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत(prartha behre with indraneel sengupta) मक्याचे कणीस खात असतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, फॅन गर्ल. इंद्रनील सेनगुप्ता तुझ्यासोबत काम करायला मजा आली. प्रार्थना बेहरेने हॅशटॅगच्या माध्यमातून ती एका हिंदी चित्रपटासाठी शूट करत असल्याचे सांगितला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर  पाहता येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग रात्री पार पडले. तिने या प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे आनंदी असल्याचे सांगितले आहे. प्रार्थनाने या चित्रपटाच्या टायटल आणि रिलीजबद्दल मात्र अद्याप काहीही सांगितले नाही.

सिनेमांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेत आहे. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र आता सिनेमांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते,असे प्रार्थनाने म्हटले होते. प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एण्ट्री मारत रसिकांची मने जिंकली.