prashant damle

 कधी कधी ठीक आहे पण शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट... वर्षानुवर्षे अतिशय प्रेमाने, निगुतीने संपूर्ण घराला सशक्त ठेवणाऱ्या सुगरणींना खुप धन्यवाद आणि अत्यावश्यक सेवेतील जीवावर उदार होऊन काम  करणाऱ्या सर्वांनाच मनापासून सलाम.

  कोरोनामुळे बाहेरची परिस्थिती फार भीषण झाली आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सूरू आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी स्विगी, झोमॅटो ना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे.  मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी यानिमित्ताने कुटुंबाला जपणा-या गृहिणींचे आणि जीव धोक्यात घालून काम करणा-या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येकाचे आभार मानले आहेत. शिवाय सर्वांना घरी राहण्याचे आवाहनही केलय.

  कधी कधी ठीक आहे पण शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट…
  वर्षानुवर्षे अतिशय प्रेमाने, निगुतीने संपूर्ण घराला सशक्त ठेवणाऱ्या…

  Posted by Prashant Damle on Sunday, April 25, 2021

  कधी कधी ठीक आहे पण शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट… वर्षानुवर्षे अतिशय प्रेमाने, निगुतीने संपूर्ण घराला सशक्त ठेवणाऱ्या सुगरणींना खुप धन्यवाद आणि अत्यावश्यक सेवेतील जीवावर उदार होऊन काम  करणाऱ्या सर्वांनाच मनापासून सलाम. आपण घरातच थांबण हीच त्यांना मदत आहे नाही का? या पोस्टसोबत त्यांनी फूड डिलिव्हरी करणा-या एका डिलिव्हरी बॉयचे फोटोही शेअर केले आहेत. यात पार्सल घेऊन निघालेला एक डिलिव्हरी बॉय घरचा डबा खाताना दिसतोय.

  प्रशांत दामले यांची आभार व्यक्त करणारी ही फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. सध्या प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.