३५ टक्के च्या निमित्ताने प्रथमेश परबला मिळाली या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी!

 संजय आणि प्रथमेश यांनी सतीश मोतलिंग दिग्दर्शित '३५% काठावर पास' या चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.

    काही कलाकार बरचा काळ काम करत असतात पण एकत्र दिसत नाही. काहींना एकत्र काम करायची संधी मिळते, पण नंतर बऱ्याचदा इच्छा असूनही कधी एकत्र काम करता येत नाही. संजय नार्वेकर आणि प्रथमेश परब यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. संजयनं मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रथमेशनंही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करत, ‘दृश्यम’सारख्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत हिंदी रसिकांचंही लक्ष वेधून घेतलं आहे.

     संजय आणि प्रथमेश यांनी सतीश मोतलिंग दिग्दर्शित ‘३५% काठावर पास’ या चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांनी पिता-पुत्राची भूमिका साकारली आहे. त्यानंतर दोघेही कधीही एकत्र दिसले नाहीत, पण दिग्दर्शक रवी जाधवच्या आगामी चित्रपटानं दोघांना पुन्हा एकत्र आणलं आहे.

    रवी सध्या ‘थ्री’ हा चित्रपट बनवण्याच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमेश आणि संजय दोघंही पुन्हा एकत्र आले आहेत. यात दोघांचे एक त्र सीन असणार की नाहीत याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नसली तरी रवीच्या सिनेमानं पुन्हा एकदा संजय-प्रथमेश यांना एकत्र आणलं आहे.