anushka

सोशल मीडियावरअनुष्काने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत अनुष्काने केलेलं हे शीर्षासन सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चेचा विषय ठरतय. तिच्या या फोटोवरून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोवरून अनेक मीम्स नेटकऱ्यांनी तयार केले आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गरोदर आहे, नवीन वर्षात ती बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणातील विविध फोटो ती चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. सोशल मीडियावर तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत अनुष्काने केलेलं हे शीर्षासन सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चेचा विषय ठरतय. तिच्या या फोटोवरून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोवरून अनेक मीम्स नेटकऱ्यांनी तयार केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

काय आहे फोटो

भिंतीचा आधार घेत अनुष्काने शीर्षासन केलय. पती विराट कोहलीने तीच्या पायांना आधार दिला आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम वगळता आवश्यक आधार घेऊन मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे.’

 

 

नेटकऱ्यांना अनुष्काचं शीर्षासन रूचेना

सध्या सोशल मीडियावर अनुष्काच्या या शीर्षासनानंतर भन्नाट मिम्स व्हायरल होतायात. या शीर्षासनामुळे पोटातील बाळाची काय अवस्था झाली असेल हे अनेकांनी या मीम्समधून मांडलं आहे. तर अनेकांनी गरोदर काळात शीर्षासन करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.