‘प्रेमा कदांता’चा रोमॅण्टीक पोस्टर, या लूकने चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली

यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असताना हे पोस्टर त्यात भर घालण्यासाठी पुरेसं असल्याचं बोललं जात आहे.

    अभिनेता अल्लू सिरीशने आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत चाहत्यांना एक सुंदर गिफ्ट दिलं आहे. अल्लूनं ‘प्रेमा कदांता’ या आपल्या आगामी रोमँटिक चित्रपटाचा फर्स्ट लुक रिव्हील केला आहे. हा लुक रसिकांची उत्कंठा वाढवणारा असून, चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण करणारा आहे. अल्लू सिरीश आणि अनु इमॅन्युएल ही ‘प्रेम कदांता’च्या पोस्टरवरील जोडी लक्ष वेधून घेते.

     या जोडीचा रोमँटिक मूड पोस्टरवर चितारण्यात आला आहे. त्यामुळं हे पोस्टर जणू एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करणारं ठरत आहे. यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असताना हे पोस्टर त्यात भर घालण्यासाठी पुरेसं असल्याचं बोललं जात आहे. ‘एबीसीडी’नंतर बऱ्याच वर्षांनी अल्लू या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे.

    हा चित्रपट ‘प्रेम कदांता’ याच शीर्षकानं हिंदीतही डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. ‘प्रेम कदांता’ हा अल्लू सिरीशचा सहावा चित्रपट आहे. ‘प्रेम कदांता’चं दिग्दर्शन राकेश शशी यांनी केलं असून, जीएटू पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.