पुन्हा प्रेक्षकांना दिसणार प्रिया- उमेशचा रोमॅण्टीक अंदाज, या वेबसिरीजचा तिसरा सीझन येणार भेटीला, फोटो व्हायरल!

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही वेबसिरीज चाहत्यांच्या आवडीची बनली आहे. याच्या पहिल्या भागात जुही आणि साकेतचं खुलणारं प्रेम, प्रेमाचे अनेक गोड किस्से दाखवण्यात आले होते.

  सगळ्यांनाच सध्या वेबसिरीजच वेड लागलं आहे. कोरोना काळात थिएटर्स बंद असल्यामुळे अनेक वेबसिरीजला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आत्तासुद्धा अनेक हिंदी, मराठी वेबसिरीज चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यातच एक वेबसिरीजची भर पडली आहे. ती म्हणजे प्रिया बापटआणि उमेश कामात यांच्या ‘आणि काय हवं’? या मराठी वेबसिरीजची.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  ‘आणि काय हवं’ ही मराठी वेबसिरीज तरुणाई मध्ये खूपच प्रसिद्ध झाली होती. यामध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामात या पती-पत्नीची जोडी होती. ही जोडी प्रेक्षकांना चांगलीचं पसंत पडली होती. या वेबसिरीजला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे या वेबसिरीजचा आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आणि काय हवं’ वेबासिरीजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

   

  नुकताच प्रिया बापटनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रीकरण सुरु झाल्याचा फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रिया बापटसह, उमेश कामत, दिग्दर्शक वरूण नार्वेकर, रणजीत गुगळे, अनिश जोग आणि अमोल साळुंखे हेसुद्धा आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही वेबसिरीज चाहत्यांच्या आवडीची बनली आहे. याच्या पहिल्या भागात जुही आणि साकेतचं खुलणारं प्रेम, प्रेमाचे अनेक गोड किस्से दाखवण्यात आले होते. या दुसऱ्या भागात जुही आणि साकेतच्या लग्नाला ३ वर्ष झाली असून लग्नानंतर त्यांच्यात घडणाऱ्या गमतीजमती, रुसवेफुगवे नवरा-बायकोच्या नात्याच्या अनेक छटा यात दाखवण्यात आल्या होत्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)