अभिनेत्री प्रिया मराठेची होळीची तयारी झाली पु्र्ण, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो!

नुकतंच या मालिकेत होळीचा सिक्वेन्स शूट झाला. या सीनसाठी केतकर आणि देशपांडे कुटुंबीयांनी रंग खेळले. त्यात प्रियाने तिचा बिफोर अँड आफ्टर फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

  झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे. नचिकेतची आई इरावती देशपांडे, तिला सई आणि केतकर कुटुंबाबद्दल असलेला तिरस्कार, तिला मान्य नसलेलं नचिकेत आणि सईच नातं, तिचे आणि अप्पांचे वाद आणि त्यानंतर सई आणि नचिकेतच लग्न मोडण्यासाठी तिने अप्पांसोबत केलेली हातमिळवणी हे सगळं बघण्यात प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

  नुकतंच या मालिकेत होळीचा सिक्वेन्स शूट झाला. या सीनसाठी केतकर आणि देशपांडे कुटुंबीयांनी रंग खेळले. त्यात प्रियाने तिचा बिफोर अँड आफ्टर फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने असंही म्हटलंय की ‘बिफोर द अटॅक अँड आफ्टर द अटॅक’. त्यावर गंमतीमध्ये तिचा ऑनस्क्रीन मुलगा नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले म्हणाला की ‘तुम्ही जे अटॅक केलेत त्याचं काय?’. प्रियाच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच हा फोटो पाहून मालिकेतील होळीच्या सिक्वेन्सची उत्सुकता देखील प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.