priya varrier

या गाण्यात प्रिया सोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युझिक दिलय. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जीने आपल्या डोळ्यांनी सगळ्यांच्या मनात राज्य केलं. ती अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर. प्रिया अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. खरतर सोशल मीडियामुळेच प्रिया प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचली. ‘ओरु अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली प्रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चा तिचे नवे गाणे प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

प्रियाचा नवीन म्यूझिक व्हिडीओ आला आहे. हे एक तेलुगू गाणं आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्याचे नाव ‘लाडी लाडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्यूजिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.