प्रियांका – निकने केली ९३ व्या ऑस्कर नामांकनाची झाली घोषणा, पण सोशल मीडियावर चर्चा रंगली निकच्या त्या ट्विटची!

या ऩॉमिनेशन सोहळ्यात प्रियांका आणि निकने चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळालं. सोहळ्यानंतरचे दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. निक जोनसने काही फोटो ट्विट करत एक पोस्ट लिहली आहे.

    लंडनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी नुकतीच २०२१ च्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा केली. ९३ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये प्रियांकाच्या ‘द व्हाइट टागर’ या सिनेमालादेखील नॉमिनेशन मिळालं आहे. २५ एप्रिलला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलय.

    या ऩॉमिनेशन सोहळ्यात प्रियांका आणि निकने चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळालं. सोहळ्यानंतरचे दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. निक जोनसने काही फोटो ट्विट करत एक पोस्ट लिहली आहे. “मला आज सकाळी या सुंदर महिलेसोबत ऑस्कर नॉमिनेश करता आलं. जिने ‘द व्हाइट टायगर’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. या संपूर्ण टीमला शुभेच्छा.

    निकच्या ट्विटला प्रियांकाने रीट्विट केलं आहे. “माझं स्वत:च ऑस्कर..तुझ्यासोबत हे क्षण शेअर करणं खूप छान होतं.. आय लव्ह यू निक..२५ एप्रिलाला ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडेल” असं तिने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.