priyanka chopra

२०१८ ला जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. २०१७ पासून दोघं एकमेकांना डेट करत होते. ‘मेट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

१ डिसेंबरला बॉलिवूडमधला सगळ्या शाही लग्न सोहळा पार पडला. सगळ्यांच्याच नजरा या सोहळ्याकडे लागल्या होत्या. हा सोहळा म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांचा. १ डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधल्या ‘देसी गर्ल’सोबत म्हणजेच प्रियांका चोप्रासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निक जोनासने त्याच्या आईला फोन करून सांगितलं की, “मला माझी जोडीदार मिळाली.” त्या घटनेच्या दोन महिन्यांतच ग्रीसमध्ये असताना निकने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केलं.

 

या दोघांच्या लग्नानंतर त्यांच वैवाहीक आयुष्य कसं आहे हे जाणून घ्यायची नेहमी उत्सुकता असते. प्रियांकाही चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करते. ती अनेकवेळा तीचे बेडरूम सिक्रेटही चाहत्यांना सांगते. प्रियांका-निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये निक व त्याच्या कुटुंबीयांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

एका मुलाखतीत प्रियांकाने बेडरूम सीक्रेट शेअर केल्या आहेत. प्रियांका म्हणाली, निक रोज उठल्यावर सर्वात आधी माझा चेहरा पाहण्याचा आग्रह धरतो. झोपेतून उठल्यावर किमान मला तोंड धुवू दे किंवा एखादा मॉइश्चराइजर तरी लावू दे असं माझं म्हणणं असतं. पण ऐकत नाही. पण हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची देखील आहे, तितकीच गोडही आहे. पतीने सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपला चेहरा पाहावा अशी अनेकांची इच्छा असते.”

 

२०१८ ला जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. २०१७ पासून दोघं एकमेकांना डेट करत होते. ‘मेट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते.