priyanka - nick

प्रियांका आणि निक यांच्यात १० वर्षांचा फरक आहे. ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात पहिल्यांदा प्रियांका आणि निक एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक जीम स्ट्रॉसे यांनी लिहिली असून दिग्दर्शनदेखील त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूडपटातदेखील झळकणार आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात रहात नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे भारतीयांच आवडतं कपल आहे. त्यामुळे ते नेहमी चर्चेतही असतात. हे दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र आता प्रियांकाने त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगवर केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

एका मुलाखतीत प्रियांकाने फॅमिली प्लॅनींग विषयी खुलासा केला आहे. प्रियांका म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये मला निकी सोबत खूप वेळ घालवायला मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतील तरी चालेल. पण मुलांची संख्या इतकी पण नको की त्यांचीच एक वेगळी क्रिकेट टीम बनेल.”