‘प्रियांकामुळे मला चित्रपटांमध्ये कामं मिळाली नाही’, देसी गर्लवर बहिणीनेच केले आरोप!

जेव्हा मी एखाद्या निर्मात्याकडे काम मागण्यासाठी जायचे तेव्ही मी प्रियांकाची बहिण असल्याने ते मला कास्ट नाही करायचे.” प्रियांका किंवा परिणीतीशी माझी तुलना न केल्याने मी स्वत:ला नशीबवान समजत असल्याचं ती म्हणाली.

  देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणीने एक धक्कादायक विधान केलं आहे. हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. अभिनेत्री मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहिण आहे. मीराने आजवर काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका तामिळ सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही तेलगू सिनेमांमध्ये देखील काम केलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Chopra (@meerachopra)

  मीरा चोप्रा बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमवतेय. मीराने ‘गँग ऑफ घोस्ट’, ‘1920 लंडन’, ‘सेक्शन 375’ अशा काही मोजक्या बॉलिवूड सिनेमांध्ये काम केलं आहे. मात्र प्रियांका चोप्रामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचा आरोप मीराने केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Chopra (@meerachopra)

  एक मुलाखतीत मीरा म्हणाली, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार होतो तेव्हा बरीच चर्चा रंगली की, प्रियांका चोप्राच्या बहिणीची एण्ट्री होतेय. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला बऱ्याच तुलनांचा तसा सामना करावा लागला नाही. प्रियांकामुळे मला काही काम मिळालं नाही. जेव्हा मी एखाद्या निर्मात्याकडे काम मागण्यासाठी जायचे तेव्ही मी प्रियांकाची बहिण असल्याने ते मला कास्ट नाही करायचे.” प्रियांका किंवा परिणीतीशी माझी तुलना न केल्याने मी स्वत:ला नशीबवान समजत असल्याचं ती म्हणाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Chopra (@meerachopra)

  पुढे ती म्हणाली, तिच्याशी संबध असल्याचा फायदा मला माझ्या करिअरसाठी तरी झाला नाही. सिनेमाची जाण असलेल्या कुटुंबातून मी येत आहे हे लोकांना माहित असल्याने त्यांनी मला गृहित धरलं नाही. नाही तर मला संघर्ष करावा लागला असता. ” असं ती म्हणाली.