remo dsouza

वाहतूक शाखेचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले की, “डिसूझा आणि खान या दोन्ही नृत्यदिग्दर्शकांनी या आठवड्याच्या सुरूवातीस सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये ते मांडवी नदीवरील अटल सेतूवर दुचाकी चालवत आहेत. हा पूल पणजीला पोरवोरिमला जोडतो. "

पणजी : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर्स रेमो डिसूझा (Remo D’Souza) आणि सलमान युसूफ खान (Salman  Y, Khan ) यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन (violating traffic rules) केल्याबद्दल कारवाई करुन दंड आकारण्याचा विचार गोवा पोलिस (Goa Police) करत आहेत.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, दोन्ही नृत्य दिग्दर्शकांनी गोव्यातील एका पुलावरून दुचाकी चालवताना स्वत: चे स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केले आहेत, तेथे दुचाकी चालवण्याची परवानगी नाही. तरीही तेथे दुचाकी चालवत व्हिडिओ काढत ते सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.

remo dsouza violating traffic rules

वाहतूक शाखेचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले की, “डिसूझा आणि खान या दोन्ही नृत्यदिग्दर्शकांनी या आठवड्याच्या सुरूवातीस सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये ते मांडवी नदीवरील अटल सेतूवर दुचाकी चालवत आहेत. हा पूल पणजीला पोरवोरिमला जोडतो. ”

ते म्हणाले की, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विभागाने दखल घेतली आहे. “आम्ही व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकीविषयी माहिती गोळा करीत आहोत. बाईक मिळताच दोन नृत्यदिग्दर्शकांवर कारवाई करुन दंड आकारण्यात येईल. ”