निर्माते नरेंद्र फिरोदिया यांचे यूट्यूबच्या विश्वात पदार्पण! खास रे टीव्ही’ ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये केली मोठी गुंतवणूक!

'काळानुसार युट्युब वाहिन्यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे आणि की, 'खास रे टीव्ही'ला इतर युट्युब वाहिन्यांप्रमाणे लोकप्रियता मिळवण्याची क्षमता आहे. प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचे कंटेन्ट देण्याचा माझा मानस आहे.

    गेल्यावर्षी जगभर पसरलेल्या व अजूनही तळ ठोकून बसलेल्या महामारीमुळे डिजिटल माध्यमांचा फायदा झाला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी युट्युबसोबत हातमिळवणी केल्यामुळे दर्शकांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिजिटल माध्यमांची वाढत चालेली लोकप्रियता लक्षात घेऊन उद्योजक व निर्माते नरेंद्र फिरोदिया यांनी लेट्सअपच्या माध्यमातून ‘खास रे’ युट्युब वाहिनीमधील प्रमुख भागभांडवल विकत घेतले आहेत. ‘लेटसअप’ हे हायपर लोकल वर्नाक्युलर इंफोटेननमेंट एप्लिकेशन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, मनोरंजन व क्रीडाविषयक बातम्या पुरवण्याचे काम करते. हे ऍप वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. ह्या एप्लिकेशनला तीन दशलक्ष ग्राहकांनी सबस्क्राईब केले आहे. ‘खास रे’ ही डिजिटल एंटरटेनमेंट कंपनी असून विविध विनोदी व्हिडीओ, गाणी त्यांच्या वाहिनीवरून प्रसिद्ध केली जातात. ‘ट्रम्प तात्या’, ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचा विडंबनात्मक ट्रेलर, जो बायडनवर आधारित मजेशीर व्हिडीओ हे या वाहिनीचे प्रसिद्ध व्हिडीओ आहेत. या वाहिनीवर नुकतेच प्रदर्शित झालेले ‘उसाचा रस’ या गाण्याला पाच लाख तर ‘ब्राऊन मुंडे’ या पंजाबी गाण्यावर आधारित ‘गावरान मुंडे’ गाण्याला आतापर्यंत तीस लाख लोकांनी पहिले आहे. त्यासोबतच ही वाहिनी बॉक्स ऑफिसवर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मराठी सिनेमांचे प्रमोशनही करते.

    सोलापूरमधील बार्शीच्या संजय श्रीधरने ‘खास रे टीव्ही’ची स्थापना केली. पुण्याला शिक्षण घेत असतानाच संजय वेडिंग फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी त्याची या माध्यमातील रुची वाढत गेली. त्यानंतर त्याने व्हिडीओ प्रॉडक्शनमध्ये संपूर्ण लक्ष घातले व महेश महामुनी, कृष्णा जानू या मित्रांसोबत मिळून ‘खास रे टीव्ही’ची स्थापना केली. या काळात संजय व त्याच्या टीमने ‘खास रे टीव्ही’ची लोकप्रियता वाढवली. ‘पाबलो शेठ’, थेट भेट’, ‘व्हायरल’ नावाची वेब सीरिज हे त्यांचे काही ट्रेंडिग व्हिडीओ आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अनोखे विषय त्यांनी हाताळल्यामुळे अनेक मराठी कलाकार त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये सुरु झालेल्या  ‘खास रे टीव्ही’ ने २०२१ मध्ये चार वर्षेयशस्वीरित्या पूर्ण केली.

    ‘काळानुसार युट्युब वाहिन्यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे आणि की, ‘खास रे टीव्ही’ला इतर युट्युब वाहिन्यांप्रमाणे लोकप्रियता मिळवण्याची क्षमता आहे. प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचे कंटेन्ट देण्याचा माझा मानस आहे.  या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कंन्टेट निर्माण करण्यासाठी मी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईन’ असे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.

    नरेंद्र फिरोदिया हे निरनिराळ्या क्षेत्रातील उपक्रमांचे संस्थापक असून त्यांना मनोरंजन क्षेत्र हे त्यांचे आवडीचे क्षेत्र आहे. ‘डबल्यूवायएन’ यांसारख्या संस्था स्टार्टअप ब्रँडसाठी काम करते तर ‘द ब्रिज’ ही संस्था स्पोर्ट्सशी निगडित कन्टेन्ट बनवते. नरेंद्र फिरोदिया यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘लेटफ्लिक्स मराठी’ ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रदर्शनाची घोषणा केली. ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन प्रादेशिक सिनेमे, लघुपट, माहितीपट इत्यादी प्रदर्शित होणार आहेत. त्यांच्या ह्या नव्या उपक्रमातून त्यांचे मनोरंजन क्षेत्राविषयीचे प्रेम दिसून येते. फिरोदिया यांनी २०१२ साली ‘अहमदनगर महाकरंडक’च्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. सद्यस्थितीत ‘अहमदनगर महाकरंडक’ ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ठरली आहे.