chhorii

अमेझॉन ओरीजनल मुव्ही ‘छोरी’ (Chhorii)प्रेक्षकांसाठी सज्ज झाला असून यंदा नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘लपाछपी’ (Hindi Remake Of Lapachapi)या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

  अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) त्यांचा आगामी हॉरर चित्रपट – ‘छोरी’चा प्रोमो रिलीज(Chhorii Promo Release) केला आहे. अमेझॉन ओरीजनल मुव्ही ‘छोरी’ (Chhorii)प्रेक्षकांसाठी सज्ज झाला असून यंदा नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘लपाछपी’ (Hindi Remake Of Lapachapi)या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

  छोरी हा एक भयपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे. भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नुसरत भरूचा दिसेल. तिच्यासोबत मिता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज झळकणार आहेत.

  हा सिनेमा भय आणि असामान्य शक्तींवर आधारित असून छोरीकरिता एबंडेंशिया एंटरटेनमेंटच्या ‘साईक’ (हॉरर आणि पॅरानॉर्मल जॉनरवर केंद्रित विभाग) आणि लॉस एंजलिस येथील क्रिप्ट टीव्ही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. क्रिप्ट टीव्हीने द लुक-सी, द बीर्च, सनी फॅमिली कल्ट आणि द थिंग इन द अपार्टमेंट अशा नवीन भयपटांची निर्मिती केली आहे.