Case filed against actress Payal Rohatgi

पायलने काही दिवसांपूर्वी एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस परिवारा बाबत चुकीचे आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत तिवारी यांनी ही तक्रार दिली आहे. पायलने अशा प्रकारचे आरोप करून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : चित्रपट अभिनेत्री पायल रोहतगी आणि एका अज्ञात इसमाविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पायलने काही दिवसांपूर्वी एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस परिवारा बाबत चुकीचे आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत तिवारी यांनी ही तक्रार दिली आहे. पायलने अशा प्रकारचे आरोप करून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

    दरम्यान, तिवारी यांनी सुरुवातीला सायबर पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. सायबर पोलिस ठाण्यातून हा अर्ज शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा करून पायल आणि व्हीडिओ तयार करणाऱ्या एका अज्ञात इसमाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.