मनोज वाजपेयीचे वडील राधाकांत वाजपेयी Passes Away; दीर्घकाळ होते आजारी

काही दिवस मनोज वाजपेयी जेव्हा केरळमध्ये आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते त्याचवेळी वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना चित्रीकरण सोडून दिल्लीला जावे लागले होते. तेव्हापासूनच त्यांच्या वडिलांची स्थिती नाजूक होती. ‘SHE’ चे दिग्दर्शक अविनाश दास यांनी आपल्या सोशन मीडिया पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    नवी दिल्ली : Manoj Bajpayee father Radhakant Bajpai passes away : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याचे वडील राधाकांत वाजपेयी (Radhakant Bajpayee) यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. वाढत्या वयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राधाकांत वाजपेयी यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    काही दिवस मनोज वाजपेयी जेव्हा केरळमध्ये आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते त्याचवेळी वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना चित्रीकरण सोडून दिल्लीला जावे लागले होते. तेव्हापासूनच त्यांच्या वडिलांची स्थिती नाजूक होती. ‘SHE’ चे दिग्दर्शक अविनाश दास यांनी आपल्या सोशन मीडिया पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पोस्टमध्ये दिग्दर्शकाने मनोजचे वडील आपल्यात नाहीत. त्यांच्यासोबत घालविलेले क्षण कायम स्मरणात राहतील. हा फोटो मी भितिहरवा आश्रमात घेतला होता. ते अत्यंत संयमी व्यक्ती होते. मुलाच्या ऐश्वर्यापासून त्यांनी स्वत:ला कायमच दूर ठेवले. सर्वसामान्य वाटत असले तरी ते खूप मोठे होते. नमन… श्रद्धांजलि।’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    मनोज वाजपेयी हे वडिलांच्या अतिशय जवळचे होते. त्यांची तब्येत बिघडल्याने तेही अतिशय चिंतेत होते. राधाकांत वाजपेयी यांना तीन मुले असून सर्वात मोठा मुलगा मनोज वाजपेयी आहे. मनोजने अभिनयात आपले करिअर करावे म्हणून कायमच वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला होता.