‘सिटी मार’च्या यशानंतर राधेमधील आणखी एक गाणं येणार चाहत्यांच्या भेटीला, सलमान- जॅकलीनची भन्नाट केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरणार!

गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे मात्र, त्यासाठी तुम्हाला हे गाणे पहावे लागेल. त्याचप्रमाणे, जॅकलीनने ज्या डांस स्टेप केल्या आहेत, त्या समजायला खूपच ट्रिकी आहेत, मात्र त्या तिने अत्यंत सहजतेने आणि शानदारपणे निभावल्या आहेत. 

    आपले पहिले गाणे ‘सिटी मार’च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे निर्माते आणखी एक डांस नंबर ‘दिल दे दिया है’ सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीज़र प्रदर्शित करण्यात आला असून गाण्याची एक झलक सादर केली आहे ज्यावरून आपल्याला अंदाज लावता येई कि हे गाणे किती धमाकेदार होणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

    टीज़र जॅकलीनच्या सिल्हूटसोबत सुरु होते त्यानंतर एक भव्य सेट आपल्या नजरेस पडतो ज्यावर हे गीत चित्रित करण्यात आले आहे. टीज़रमध्ये अभिनेत्रीने एक एथनिक ड्रेसमध्ये दाखवण्यात आले असून तो ती अत्यंत सुंदरपणे कॅरी करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये आपण जॅकलीनला अनेक डांस नंबरमध्ये पहिले आहे मात्र, यात ती त्या सगळ्यांहून अनोखी दिसते आहे. गाण्यात आपण सलमान आणि जॅकलीनला लाईव्ह बीट्सवर थिरकताना पाहू शकतो, जे आपल्या परफॉर्मन्सला खूप एन्जॉय करत आहेत. सलमान आणि जैकलीनची जोड़ी नेहमीच चमकदार राहीली आहे आणि असेच काहीसे ‘दिल दे दिया है’मध्ये बघण्यास मिळत आहे. 

    गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे मात्र, त्यासाठी तुम्हाला हे गाणे पहावे लागेल. त्याचप्रमाणे, जॅकलीनने ज्या डांस स्टेप केल्या आहेत, त्या समजायला खूपच ट्रिकी आहेत, मात्र त्या तिने अत्यंत सहजतेने आणि शानदारपणे निभावल्या आहेत.  हे गाणे एका उत्तम चित्रपटामध्ये एक उत्कृष्ट अॅडिशन ठरेल. निश्चित रूपाने, सलमान आणि राधेच्या चाहत्यांसाठी त्यांच्या उत्सुकतेचा हा परमोच्च बिंदू असेल.