प्रभास-पूजाची जन्माष्टमी भेट, ‘राधे श्याम’ चं नवीन पोस्टर चाहत्यांच्या भेटीला!

या उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या पोस्टरनं जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर नव्या पोस्टरचं अनावरण केलं आहे.

    प्रभासचा चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटांची आतुरतेनं वाटत पहात असतात. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. ‘राधे श्याम’च्या रूपात प्रेक्षकांना प्रभासचं नवं रूप पहायला मिळणार होतं, पण कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं त्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली आहे. पॅन इंडिया स्टारचा बिग कॅनव्हास, रोमँटिक ड्रामा ‘राधे श्याम’ पुढील वर्षी मकर संक्रांतीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    या उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या पोस्टरनं जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर नव्या पोस्टरचं अनावरण केलं आहे. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेनं एक चित्ताकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसत आहे, पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखं भासत असून, चित्रपटानं चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक यात आहे.

    राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित ही एक बहुभाषिक प्रेमकथा १९७०मध्ये युरोपमध्ये घडते आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सनं सज्ज ‘राधे श्याम’ एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.