‘राधेश्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

जगभरातील चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. ‘राधेश्याम’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही गुलशन कुमार आणि टी-सीरीजची प्रस्तुती असून यूवी क्रिएशन्सद्वारे निर्मित आहे. आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘राधेश्याम’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टरद्वारे आज प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे  दिसत आहेत.

‘राधेश्याम’  चित्रपट २०२१ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे ही मनोरंजन उद्योगासाठी खूपच चांगली बातमी आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडियावर हे पोस्टर सादर करताना लिहिले आहे की,“माझ्या चाहत्यांनो हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे.”

युवी क्रिएशन्सचे प्रमोद याविषयी सांगतात की, “हा आमच्या सगळ्यांसाठीच एक रोमांचक क्षण आहे कि आम्ही आमच्या आगामी प्रोजेक्ट ‘राधेश्याम’मधील प्रभास आणि पूजा हेगडे यांचे बहुप्रतीक्षित पोस्टर प्रदर्शित केले आहे. प्रभाससोबत काम करणे नेहमीच मजेदार आणि समृद्ध करणारे  असते.”ते पुढे म्हणाले की, “आमच्या या आधीच्या प्रोजेक्ट ‘साहो’, ज्याला सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भूषण कुमार आणि टी-सीरीजच्या टीमसोबत पुन्हा काम करताना आम्हाला आनंद होतो आहे.”

प्रभास अभिनित या चित्रपटामध्ये पूजा हेगडे, भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन अशा मोठ्या कलाकारांची फळी दिसणार आहे. ‘राधेश्याम’ची सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांच्याद्वारे करण्यात आली असून प्रोडक्शन डिझायनर आरवीवीएंडर आहेत. कमल कन्नन यांनी वीएफएक्स प्रोड्यूसर म्हणून धुरा सांभाळली आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीजद्वारे प्रस्तुत ‘राधेश्याम’, यूवी क्रिएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी एडिटिंग केले आहे. चित्रपटाचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.