‘न्यूड सीन देणे सोपे नव्हते’, Nude Clip व्हायरल झाल्यानंतर राधिका म्हणते…

 ‘न्यूड सीन देणे सोपे नव्हते कारण त्यावेळी मी माझ्या स्वत: च्या बॉडी इमेजच्या मुद्द्यांशी वाद घालत होते. म्हणून, न्यूड सीन शूट करताना भीती वाटत होती. आता मी हे सर्व कुठेही करु शकते’ असे राधिका पुढे म्हणाली.

  ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटातून माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली राधिका उत्तम अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचली आहे. पण काही दिवसांपूर्वी राधिकाची एक न्यूड क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता एका मुलाखतमध्ये तिने यावर वक्तव्य केले आहे.

  चार दिवस घराबाहेर पडले नाही…

  राधिकाने नुकतीच ‘ग्रेझिया मॅगझिन’ला मुलाखत दिली. त्यावेळी तिने न्यूड क्लिप लीक झाल्याचा तिच्यावर परिणाम झाला होता असे म्हटले. ‘Clean, Shaven चित्रपटाच्या वेळी जेव्हा माझी न्यूड क्लिप लीक झाली होती तेव्हा मी प्रचंड ट्रोल झाले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. मीडिया माझ्या विषयी काय बोलते म्हणून नाही तर माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्ट माझ्याविषयी काय विचार करत असतील म्हणून मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली.

   ‘जे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये मी नाही असा अनेकांनी अंदाज लावला असेल. मला असे वाटत नाही की एखादी व्यक्ती असे करु शकेल किंवा करु ही शकते. या कडे दुर्लक्ष करायला हवे. याकडे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Radhika (@radhikaofficial)

   ‘न्यूड सीन देणे सोपे नव्हते कारण त्यावेळी मी माझ्या स्वत: च्या बॉडी इमेजच्या मुद्द्यांशी वाद घालत होते. म्हणून, न्यूड सीन शूट करताना भीती वाटत होती. आता मी हे सर्व कुठेही करु शकते’ असे राधिका पुढे म्हणाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Radhika (@radhikaofficial)

  राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. तसेच ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती.