रेडिओ सिटीचा महाराष्‍ट्रामध्‍ये ‘ई-बाप्‍पा’ उपक्रम

मुंबई : दरवर्षी गणेशोत्‍सव (ganeshotsav) राज्‍यांमधील नागरिकांमध्‍ये प्रचंड आनंद व उत्‍साह घेऊन येतो. यंदा कोविड-१९ (covid-19) महामारीमुळे उत्‍सव साजरा करण्‍यावर काहीशी बंधने असताना देखील नागरिकांमध्‍ये गणेशोत्‍सव साजरा करण्‍याचा उत्‍साह कायम आहे. सद्यस्थिती लक्षात घेत रेडिओ सिटी(radio city) या भारताच्‍या आघाडीच्‍या रेडिओ नेटवर्कने अगदी नेहमीसारखा, पण व्‍हर्च्‍युअली जल्‍लोषात गणेशोत्‍सव साजरा करण्‍यासाठी ‘सिटीचा ई-बाप्‍पा’ (citycha e bappa) उपक्रम सुरू केला आहे.

‘सिटीचा ई-बाप्‍पा’च्‍या माध्‍यमातून मुंबई व महाराष्‍ट्रातील रेडिओ सिटी आरजे श्रोत्‍यांसह संवाद साधतील, झूमवर ऑनलाइन गेम्‍स खेळतील आणि काही विजेत्‍यांची निवड करतील, ज्‍यांना आकर्षक बक्षीसांसह पुरस्‍कारित करण्‍यात येईल. भाग्‍यवान विजेत्‍यांना एकत्र उत्‍सवाचा आनंद साजरा करण्‍यासाठी त्‍यांच्‍या इमारती/घरांमध्‍ये व्‍हर्च्‍युअली आरजेंना आमंत्रित करण्‍याची संधी देखील मिळेल. रेडिओ सिटी आरजे (rj) सेलिब्रिटींशी संलग्‍न होतील, नागरिकांसोबत साजरीकरणांच्‍या झलक शेअर करतील आणि महामारीदरम्‍यान उत्‍सव साजरा करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या अनुभवांना देखील शेअर करतील. दरवर्षीप्रमाणे पुण्‍यामध्‍ये आमचे आरजे १० दिवस दगडूशेठ गणपती मंदिर व श्री कसबा गणपती येथील लाइव्‍ह शो अनुक्रमे सकाळी व सायंकाळी प्रसारित करतील. गणेशभक्‍तांना त्‍यांच्‍या घरामध्‍येच आरामशीरपणे डिजिटल स्ट्रिमिंगच्‍या माध्‍यमातून १० दिवस दोन्‍ही मंदिरांमधील उत्‍सवांचा आनंद घेण्‍याची संधी मिळेल.

याबाबत बोलताना रेडिओ सिटीचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर श्री. कार्तिक कल्‍ला म्‍हणाले, ”रेडिओ सिटीने नेहमीच श्रोत्‍यांशी संलग्‍न होण्‍याकरिता नवनवीन मार्गांचा अवलंब केला आहे. ‘सिटीचा ई-बाप्‍पा’ हा आमच्‍या कटिबद्धतेला सिद्ध करणारा आणखी एक उपक्रम आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा लोकांना त्‍यांच्‍या घरामधूनच सुरक्षितपणे हा उत्‍सव साजरा करण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचा आणि या व्‍हर्च्‍युअल साजरीकरणाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या श्रोत्‍यांमध्‍ये उत्‍सवाचा उत्‍साह व जल्‍लोष कायम ठेवण्‍याचा मनसुबा आहे. रेडिओ सिटीमध्‍ये आम्‍ही सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये देखील आमच्‍या श्रोत्‍यांमध्‍ये आनंद, सुसंगता व सकारात्‍मकतेचा प्रसार करण्‍याचे आमचे ध्‍येय पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न सुरूच ठेवू.”

मुंबईमध्‍ये श्रोत्‍यांची सुरक्षितता लक्षात घेत आणि त्‍यांच्‍या घरांमध्‍ये उत्‍सवाचा उत्‍साह आणत रेडिओ सिटी दररोज सकाळी व सायंकाळी रेडिओवर लाइव्‍ह आरती प्रसारित करेल. अष्‍टविनायक गणपतींबाबत ऑडिओ माहितीपटाचे पॉडकास्‍ट्स देखील रेडिओवर प्रसारित करण्‍यात येईल. रेडिओ सिटी नागरिकांसोबत संलग्‍न होण्‍याकरिता त्‍यांच्‍या सोशल मीडिया हँडल्‍सवर विविध डिजिटल स्‍पर्धा देखील घेणार आहे.

रेडिओ सिटीच्‍या बेंगळुरू व हैद्राबादमधील त्‍यांच्‍या श्रोत्‍यांसाठी देखील अशा प्रकारच्‍या योजना आहेत. गणेशोत्‍सवाच्‍या १० दिवसांदरम्‍यान रेडिओ सिटी आरजे ‘सिटी गणेशोत्‍सव’च्‍या माध्‍यमातून श्रोत्‍यांना दररोज सायंकाळी ६ वाजल्‍यापासून मंडळामधील गणेशोत्‍सव साजरीकरणाचा अनुभव देतील. मंडळामध्‍ये गणेशोत्‍सवाचा आनंद घेण्‍याची आठवण येणा-या श्रोत्‍यांसाठी रेडिओ सिटी शहरभरातील विविध मंदिरांमधील लाइव्‍ह आरती देखील प्रसारित करणार आहे. तसेच सर्व फूडी श्रोत्‍यांसाठी रेडिओ स्‍टेशन घरामध्‍ये सहजपणे बनवता येऊ शकणा-या रेसिपीज सांगण्‍यासाठी तज्ञांना आमंत्रित करणार आहे. मधुरमय संगीत, पॉवर पॅक मनोरंजन आणि हलके-फुलके स्‍टॅण्‍ड-अप कॉमेडी तुमच्‍या घरी मनोरंजनासाठी येणार आहेत.