राहुल वैद्यसाठीही सलमान खान ठरला गॉड फादर, आपल्या चित्रपटात दिली मोठी संधी!

सलमान खान स्टारर 'राधे'च्या राइट्‌ससाठी मोठी रक्‍कम मोजण्यात आली आहे. तसेच करोना काळातील 'राधे'ची डील ही सर्वात मोठी मानली जात आहे. हा चित्रपट ईदनिमित्त १४ मे रोजी प्रदिर्शत करण्यात येणार आहे.

    बॉलीवूडमधील सुपरस्टार सलमान खान अनेक जणांसाठी गॉडफादर ठरला आहे.  इंडस्ट्रीत दिर्घ काळापासून असलेल्या सलमानने अनेक जणांना संधी दिली. आता त्याने बिग बॉस-१४ मधील कंटेस्टेंट राहुल वैद्यला एक मोठी संधी दिली आहे. सलमानच्या आगामी ‘राधे यॉर मोस्ट वॉंटेड भाई’मध्ये राहुलला एक गाणे गाण्याची ऑफर दिली आहे. या चित्रपटात राहुल हा एक रोमांटिक गाणे गाणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

    ही संधी मिळाल्यास राहुल वैद्यला बॉलीवूडमधील प्रवेशद्वार खुले होणार आहे. राहुल वैद्यने ‘इंडियन आयडल-१’मधून आपल्या करियरची सुरूवात केली होती. यानंतर राहुलने आपला ‘तेरा इंतजार’ हा अब्लम रिलीज केला होतो, जो सुपरहिट ठरला होता.

    दरम्यान, सलमान खान स्टारर ‘राधे’च्या राइट्‌ससाठी मोठी रक्‍कम मोजण्यात आली आहे. तसेच करोना काळातील ‘राधे’ची डील ही सर्वात मोठी मानली जात आहे. हा चित्रपट ईदनिमित्त १४ मे रोजी प्रदिर्शत करण्यात येणार आहे.