असं चालवत होता राज संपूर्ण रॅकेट, What’s App चॅट आलं समोर, मेसेज वाचून चक्रावून जाल!

त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्यामधील संभाषणामध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता.

  पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना काल रात्री मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.

  राज कुंद्राचा प्रदीप बक्षी नावाचा जोडीदार ज्याच्याबरोबर राज कुंद्राची व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आले आहे की, राज कुंद्रा स्वत: अश्लील चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या सर्व व्यवसायांवर नजर ठेवत असे.

  त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्यामधील संभाषणामध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता.

  अश्लील चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींविषयी चर्चा

  या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कुंद्राने लंडनमधील त्याची कंपनी चालवणाऱ्या प्रदीप बक्षीशी संभाषण केले होते, जे लंडनमधून वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अश्लीलतेचे व्हिडीओ अपलोड करायचे. या संभाषणामध्ये दैनंदिन उत्पन्न वाढणार्‍या ग्राहकांचा उल्लेखही आहे. राज कुंद्रा या ग्रुपमध्ये दररोज सर्व तपशील घेत असत की, किती नफा झाला, किती तोटा होतो आणि व्यवसाय कसा वाढवता येतो, यावर चर्चा करत. दिवसाच्या कमाईचा हिशेबही ठेवला जात असे.

  राज कुंद्राशी संबंधित या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ५ सदस्य होते. यामध्ये त्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत की, कोणती नायिका कधी बोलावायची, काय करायचे. त्यांच्याशी व्यवहार कसे करावे. त्यांना काय म्हणाचे आणि शूटसाठी त्यांना केव्हा कॉल करायचा. पोर्नोग्राफीमध्ये काम करणार्‍या अभिनेत्रीच्या पैशांच्या व्यवहाराचा पूर्ण उल्लेखही या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नोंदवला गेला आहे. राज कुंद्रा या चॅटमध्ये मार्केटींगची रणनीती, वाढती विक्री, मॉडेल्सचे पेमेंट आणि इतर सौद्यांविषयी बोलले जात असे. या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव “एच” अकाउंट्स होते. राज कुंद्राच्या अटकेमध्ये हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट मुख्य कारण ठरले.

  गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

  काय आहे  ‘अँटी पोर्नोग्राफी लॉ’

  अँटी पोर्नोग्राफी लॉ नुसार लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याची निर्मिती करणे. तसेच याप्रकारच्या कंटेन्टचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवून ते इतरांपर्यत पोहचवणाऱ्या लोकांवर या कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल होतो. 

  Raj Kundra And Pradeep Bakshi what’s app chat revealed