पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती दोषी आढळ्यास राज कुंद्राला होऊ शकते ‘ही’ शिक्षा; जाणून घ्या ‘अँटी पोर्नोग्राफी लॉ’

राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो.

  मुंबई: पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना काल रात्री मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.

  ही असू शकते शिक्षा

  या प्रकरणात आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद होतो. तसेच गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोषी ठरवले गेले तर त्याला अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागू शकते.

  या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद आहे.

  गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पहिल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

  पुन्हा तो गुन्हा केल्यास या शिक्षेत वाढ होऊ ७ वर्षांपर्यंत होऊ शकते.

  काय आहे  ‘अँटी पोर्नोग्राफी लॉ’

  अँटी पोर्नोग्राफी लॉ नुसार लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याची निर्मिती करणे. तसेच याप्रकारच्या कंटेन्टचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवून ते इतरांपर्यत पोहचवणाऱ्या लोकांवर या कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल होतो