Bollywood actress Shilpa Shetty's husband and famous businessman Raj Kundra arrested; Pornographic video recording case

भिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येतेय.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधून काही अश्लील चित्रफिती हाती लागल्या आहेत. या प्रकरणात हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला अटक करण्यात आली. आता याप्रकरणी लवकरच राजची बायको आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

    राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का?  अशी चर्चा आता रंगली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘शिल्पा योग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये राज कुंद्रा हा डायरेक्टर असल्याचं दाखवण्यात आलंय. परंतु पोलिसांच्या तपासात तो या कंपनीचा डायरेक्टर नसल्याचं उघड झालंय. त्याचप्रमाणे राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येतेय.

    पोलिस घेतायत शोध

    ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील क्लिप विकण्याचा प्रकार सुरू होता, अशाच प्रकारचा आणखी एक अ‍ॅप ‘जेएल ५०’ याचं सोशल मीडिया ब्रॅण्डींग देखील अभिनेत्री शिल्ला शेट्टीनं केलं होतं. त्यामूळे राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्ला शेट्टीला सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी अगदी बारकाईने आपला तपास सुरू केला आहे. सध्या तरी या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.