राज कुंद्रा ‘या’ प्लॅटफॉर्मद्वारे करत होता अश्लील व्हिडीओ ट्रान्सफर ; पॉर्न इंडस्ट्रीत केलीय ‘एवढ्या’ कोटींची गुंतवणूक

कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये ८ ते १० कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केनरीन, वेट्रान्सफर प्लॅटफॉर्म आणि हॉटशॉट्स अ‍ॅप नावाच्या कंपनीचे नाव चर्चेत पुढे आली आहेत.

  मुंबई: पॉर्न इंडस्ट्रीतील जादूचा जिन पुन्हा एकदा बाटलीच्या बाहेर आलेला आहे. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीत सुरू असलेल्या रहस्यमय गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी बाटलीतून बाहेर आलेला जीनी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा कडून ही माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

  पॉर्न कंटेंटची निर्मिती केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटककेले असून तपास सुरु आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये ८ ते १० कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केनरीन, वेट्रान्सफर प्लॅटफॉर्म आणि हॉटशॉट्स अ‍ॅप नावाच्या कंपनीचे नाव चर्चेत पुढे आली आहेत.

  राज कुंद्राने ब्रिटन येथे र रहाणार्या आपल्या भावासोबत मिळवून केनरिन नावाची कंपनी तयार केली. परंतु भारतातील सायबर कायद्यापासून बचाव करण्यासाठी या कंपनीची नोंदणी परदेशात केली. इतकंच नव्हेत तर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण भारतात शूट केले,त्यानंतर ते वे ट्रान्सफर मार्गे केनरिन येथे पाठविले गेल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर या व्हिडीओची हॉट शॉट्ससह अनेक ऍपवर सबस्क्रिप्शन द्वारे सशुल्क विकण्यात आले आहे.

  काय आहे वी ट्रान्सफर (we Transfer)
  we Transfer हे फाईल डेटा ट्रान्सफरसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अनेक जीबी फाईली सहजपणे पाठवू शकतो. फाईलचा आकार जीबीपेक्षा अधिक असेल तर यास सेवेतील प्रो सेवेचा वापर करू शकतो. १ टीबी डेटा सहजपणे ट्रान्सफर करता येतात.

  असे करता we Transfer लॉगिन ;प्रक्रिया समजून घ्या

  • सर्वप्रथम वेट्रान्सफर डॉट कॉम वेबसाइट उघडा .
  • त्यात विनामूल्य सेवा निवडा. आपण २०० GB पर्यंत फायली पाठविण्यास सक्षम असाल.
  • तुमच्या आपल्या फाईल्स जोडा वर क्लिक करून फाईल सिलेक्ट करा.
  • त्यानंतर ज्या व्यक्तीला फाइल पाठवत आहात त्याचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा, त्यानंतर आपला ईमेल.
  • जर फाईलसह संदेश देऊ इच्छित असल्यास आपण ते देखील लिहू शकता.
   आपण संकेतशब्द फाइल संरक्षित करू इच्छित असल्यास, आपण ते सेट करू शकता.
  • कंपनीच्या क्लाऊडवर अपलोड झाल्यानंतर ते वापरकर्त्यापर्यंत पोहोचेल.