राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर

राज कुंद्राच्या कंपनीचा काही भाग कानपूरमधील दोन क्लाएंटच्या खात्यात जमा होत होता. बर्रा आणि कॅंट येथील बॅंकांमधील खात्यांमध्ये अनेकवेळा देवाण-घेवाण झाल्याचं दिसलं. शुक्रवारी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या आदेशावरून ही खाती सीज करण्यात आली.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा(Raj Kundra) पॉर्न सिनेमाप्रकरणी अधिकच खोलात अडकत असल्याचं दिसत आहे. चौकशीतून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्राच्या कंपनीचा काही भाग कानपूरमधील दोन क्लाएंटच्या खात्यात जमा होत होता. बर्रा आणि कॅंट येथील बॅंकांमधील खात्यांमध्ये अनेकवेळा देवाण-घेवाण झाल्याचं दिसलं. शुक्रवारी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या आदेशावरून ही खाती सीज करण्यात आली.

    या खात्यांमध्ये २.३८ कोटी रूपये जमा आहेत. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या ११ सहकाऱ्यांची १८ बॅंक खाती सीज केली आहेत. यात ७.३१ कोटी रूपये जमा आहे. यातील एक हर्षिता श्रीवास्तव नावाची महिला आहे आणि दुसरीचं नाव नर्बदा श्रीवास्तव आहे. हर्षिताचं खातं बर्रा येतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत आहे. या खात्यांमध्ये २ कोटी ३२ लाख ४५ हजार २२२ रूपये जमा आहेत.