raja ranichi g jodi sanjivani

नुकत्याच समोर आलेल्या ‘राजा रानीची गं जोडी’(Raja Ranichi Ga Jodi) या मालिकेच्या प्रोमोमध्ये संजीवनी ठामपणे तिचं मत रणजीत पुढं मांडताना दिसते. ‘अर्जुनालाही त्याच्या घरच्यांविरुध्द उभं राहावं लागलंच होतं. मी घरच्यांच्या नाही सत्याच्या बाजूनं उभं रहाणार’, असं म्हणताना ती दिसली.

    ‘राजा रानीची गं जोडी’(Raja Ranichi Ga Jodi) या कलर्स मराठीवरील (Colors Marathi)मालिकेतील संजीवनीच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचं कारण आहे अपर्णाची अचानक झालेली हत्या(Death of Aparna). काही दिवसांपूर्वी कुसुमावती अपर्णाला भेटायला गेल्याचं दाखवण्यात आलं. त्याचवेळी सुजितदेखील अपर्णाला रागामध्ये भेटायला निघाला होता. हे घडत असतानाच दादासाहेब आणि राजश्रीदेखील अपर्णाबद्दल बोलताना संजीवनीनं(Sanjivani) बघितलं. ज्यामध्ये दादासाहेब कुठे अपर्णाच्या जीवाचं बरं-वाईट करू इच्छित नाही ना असं मनात येऊन गेलं, पण आता अपर्णाची हत्या झाली असून, तीन संशयी आहेत.

    तिन्ही संशयी ढालेपाटीलांच्या घरातील असल्यानं संजीवनीसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. सुजित असो, कुसुमावती असो, वा दादासाहेब… निर्णय तिला घ्यावाच लागणार आहे.

    नुकत्याच समोर आलेल्या ‘राजा रानीची गं जोडी’(Raja Ranichi Ga Jodi) या मालिकेच्या प्रोमोमध्ये संजीवनी ठामपणे तिचं मत रणजीत पुढं मांडताना दिसते. ‘अर्जुनालाही त्याच्या घरच्यांविरुध्द उभं राहावं लागलंच होतं. मी घरच्यांच्या नाही सत्याच्या बाजूनं उभं रहाणार’, असं म्हणताना ती दिसली. या खुनाच्या शोधात संजीवनीला रणजीतची साथ प्रत्येक वळणावर मिळणार हे निश्चित.