समिक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण, कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू!

काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळं त्यांनी कोरोना टेस्ट केली. अन् त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक नामांकित कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. प्रसिद्ध चित्रपट समिक्षक आणि धर्मा कॉर्नरस्टोन कास्टिंग एजन्सीचे सीईओ राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलय.

    काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळं त्यांनी कोरोना टेस्ट केली. अन् त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र मिळालेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्र हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळं नाजून परिस्थितीत असल्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.