डिम्पलशी लग्न केल्यानंतर राजेश खन्ना आकंठ बुडालेले टीना मुनीमच्या प्रेमात, लिव्हइनरिलेशनशीपमध्ये रहात होते दोघं पण….

तर झालं असं सौतन सिनेमादरम्यान राजेश खन्ना आणी टीना मुनिम यांच्यातली जवळीक वाढू लागली. दोघांयाही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.

    राजेश खन्ना यांनी आपल्या चित्रपटांनी रसिकांना वेड लावलं. त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींशी राजेश खन्ना यांची सिनेमात जोडी जमली. त्याकाळी त्यांच्या अफेरच्या चर्चाही खूप रंगल्या. असं म्हणतात डिम्पल कपाडियासोबत लग्न केल्यानंतर राजेश खन्ना टीना मुनिमबरोबर रिलेशनशिपमध्ये आले होते.

    तर झालं असं सौतन सिनेमादरम्यान राजेश खन्ना आणी टीना मुनिम यांच्यातली जवळीक वाढू लागली. दोघांयाही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. टीनावर राजेश मनापासून प्रेम करायचे. ते एकत्र राहू लागले. राजेश खन्ना यांनीदेखील हे नाते कधीच लपवले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की, मी टीनावर एवढे प्रेम करतो की मी तिचा दात घासण्यासाठी टुथब्रश पण वापरतो. यानंतर त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा देखील झाली होती.

    डिंम्पलला घटस्फोट नाहीच

    टिनाची इच्छा होती की डिम्पलला घटस्फोट देऊन त्यांनी तिच्याशी लग्न करावे. पण इच्छा असूनही राजेश खन्ना हे करू शकले नाही. राजेश जेवढे प्रेम टिनावर करायचे त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम ते डिंपलवर करायचे. टीनाला वाटले की राजेश तिला फसवत आहेत. बरीच वाट पाहिल्यानंतर टीनाने त्यांच्याबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

    टीनाच्या निर्णयाने राजेश खन्ना पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्यांनी तिने सोडून जाऊ नये म्हणून अनेकवेळा टीनासमोर विनावण्या केल्या.पण टीनाने निर्णय घेतला होता. नंतर संजय दत्त टीनाच्या आयुष्यात आले. पण टीनाने त्याला त्याच्या ड्रग्स व्यसनामुळे त्याला सोडून दिले आणि बिझनेसमन अनिल अंबानीशी लग्न केले.