‘बधाई दो’, राजकुमारचा आगामी चित्रपट, ‘या’ सिनेमाचा आहे सिक्वल!

पॉवरहाऊस परफॉर्मर अशी आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या राजकुमारकडेही त्याच नजरेतून पाहिलं जात आहे. राजकुमारनं 'बधाई हो' या आपल्या आगामी चित्रपटासाठी अफलातून ट्रान्सफॉर्मेशन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

    राजकुमार राव यानं नेहमीच आपल्या विविधांगी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आश्चर्यचकीत केलं आहे. चाकोरीबद्ध भूमिकांची चौकट मोडून राजकुमारनं स्वत:ला सिद्ध केलं आहे. याच कारणामुळं आज तो हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांसोबत काम करत असून, आघाडीच्या अभिनेत्यांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे.

    स्वत:सोबतच आपल्या अभिनयशैलीमध्ये काळानुरूप बदल घडवत जे कलाकार पुढे गेले तेच मोठे झाले याची साक्ष इतिहास देतो. आमिर खान हे याचं चालतं बोलतं उदाहरण आहे. पॉवरहाऊस परफॉर्मर अशी आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या राजकुमारकडेही त्याच नजरेतून पाहिलं जात आहे. राजकुमारनं ‘बधाई हो’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी अफलातून ट्रान्सफॉर्मेशन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

     आता ‘बधाई दो’ या चित्रपटात राजकुमारचं एक वेगळं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे, पण त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. हर्षवर्धन कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘बधाई दो’ हा २०१८मध्ये आलेल्या ‘बधाई हो’चा स्पिरीच्युअल सिक्वेल आहे. यात पुन्हा भूमी पेडणेकरसोबत राजकुमारची जोडी जमली असून, रेखा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.